Ah Mahabms योजना 2023 अर्ज । गाई म्हशी वाटप योजना लिस्ट 2023

Ah Mahabms

Ah Mahabms : नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारच्या दूध देणाऱ्या पाळीव प्राणी वाटपाच्या योजने बाबत आणि गाई /म्हशी वाटप योजना Mahabms लिस्ट ची माहिती घेणार आहोत.

म्हणजे आपण दुधाळ गाई किंवा म्हशीच्या वाटप योजनेसंदर्भात या लेखामध्ये पूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेची कार्यप्रणाली, कोणत्या जिल्ह्यांसाठी ही योजना राबवली जाते, शासनाचा निर्णय, या प्रकल्पामध्ये योजनेकडून मिळणारी किंमत, लाभार्थ्यांची निवड, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याचे ठिकाण, माध्यम आणि कुठे करायचे, या सर्व गोष्टींची माहिती या लेखात तुम्हाला आज मिळवणार आहे.

Ah Mahabms Innovation Plan 2023

Ah Mahabms scheme 2023 सरकार द्वारे या योजनेअंतर्गत, योजना महिला बचत गट, अल्पभूधारक शेतकरी, तसेच त्यांना सुशिक्षित बेरोजगार मिळावा म्हणून या योजनेत यांना प्राधान्याने लाभ घेण्यात येणार आहे.

ही योजना राज्याच्या पशुसंवर्धन विभागांच्या अधिकृतीने अमलात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत संकरित आणि देशी गाईंचे वाटप करण्यात येणार आहे. या योजने मध्ये दुधाची पाळीव जनावरे गाई-म्हशी, शेळी संकरित गाई /म्हशी असतील.

Free Cow Buffalo Allocation Scheme List 2023
Free Cow Buffalo Allocation Scheme List 2023

१. MAHABMS गाई, म्हशी आणि संकरित गाई, म्हशी याची वाटप

२. MAHABMS योजनेत प्रति अर्जदाराला गाय, म्हैस साठी अनुदान किती?

३. MAHABMS कागदपत्र कुठे अपलोड करायची?

४. MAHABMS मुदत किती?

AH MAHABMS Update


१. सर्व लाभार्थ्यांना सूचित केलं जात आहे की लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी पासवर्ड धोरणांची बदली करण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा युजरनेम (वापरकर्तानाव) पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक असेल. पासवर्ड लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जामध्ये दिलेल्या बँक खात्याच्या शेवटचे ६ आकडे असेल हे कृपया लक्षात घ्यावे.
२. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत वाढविली जाईल. याची कृपया नोंद घ्यावी.
३. प्रणालीमुळे SMS येतील लाभार्थ्यांना केवळ कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल.

Ah Mahabms Scheme 2023 Online Application

Ah Mahabms Innovation 2023

Ah Mahabms Innovation 2023 याअंतर्गत लाभार्थी आणि इच्छुक अर्जदार ऑनलाईन पद्धतीने निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आपण योजनेचे वेळापत्रक येथे पाहू शकता.

AH MAHABMS Update
AH MAHABMS Update

mahabms list | Mahabms योजनेचे वेळापत्रक

दिनांककामाचा तपशीलएकुण दिवस / कालावधी
13.12.2022 ते 11.01.2023ऑनलाईन अर्ज स्वीकारणे30
12-13 जानेवारी 2023डेटा बॅकअप करणे2
14 – 18 जानेवारी 2023रॅडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड5
19 जानेवारी 2023राखीव1
20-27 जानेवारी 2023मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे8
28 जानेवारी 2023राखीव1
29- 5 फेब्रुवारी 2023पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा | पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करणे8
6 फेब्रुवारी 2023राखीव1
7-8 फेब्रुवारी 2023लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता2
9 फेब्रुवारी 2023कागदपत्रे अंतिम पडताळणी1
10 फेब्रुवारी 2023राखीव1
11 फेब्रुवारी 2023अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार1
एकूण61
Mahabms table

Ah Mahabms 2023 ऑनलाइन अर्ज

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन 2022-23 या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडण्यासाठी ची आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत संपली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक 11.01.2023 याच दिवसापर्यंत होती.

सन 2021-22 या वर्षी Mahabms साठी अर्ज केलेल्या लाभार्त्यांची प्रतिक्षाधीन यादी पुढील 5 वर्ष ग्राह्य म्हणजेच या यादी प्रमाणे पुढील 5 वर्ष या यादीच्या लाभार्त्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिले जाईल म्हणजे 2025-26 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.

सन 2021-22 या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन 2022-23 पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल. म्हणजे मागच्या वर्षीच्या वेटिंग लिस्ट मधील अर्जदारांना पहिल्यांदा अग्रगण्य दिले जाईल, आणि त्यानंतर नवीन अर्जदारांची निवड करण्यात येईल.

सन 2022-23 मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उत्पन्न निधीच्या अधिन राहून देण्यात येणार आहे

Mahadbt Scholarship Scheme

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी दि. 23/01/2023 ते दि. 23/01/2023 या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना QP-EVDTEC या नावाकडून SMS आला असेल त्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी “कागदपत्रे अपलोड करा” या ठिकाणी आपली कागदपत्रे अपलोड करावीत लागतील.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त “QP-EVDTEC” या नावाने SMS प्राप्त होतील. आणि इतर लाभार्थ्यांची नावे प्रतीक्षाधीन यादीमध्ये समाविष्ट होतील. प्रतीक्षाधीन अर्जदारांना त्यांना त्यांच्या यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उत्त्पन्न निधीच्या अधिन राहून त्यांना पुढील 5 वर्षामध्ये लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी कृपया अचूक आणि योग्य कागदपत्रे अपलोड करण्याची खबरदारी घ्यावी.

योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.
योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.

Ah Mahabms 2023 ऑनलाइन अर्ज

Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2023 ऑनलाइन अर्ज

नाविन्यपूर्ण योजना 2023 अर्ज कसा व कुठे करावा? । How to apply for MAHABMS Scheme 2023?

नाविन्यपूर्ण योजना 2023 अर्ज कसा व कुठे करावा?

Mahadbt Scholarship Scheme
Mahadbt Scholarship Scheme

योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी www.ah.mahabms.com या संकेतस्थळावर आणि AH-MAHABMS हे मोबाइल अँप च्या माध्यमातून अर्जदार अर्ज करू शकतात.

त्यामुळे अर्ज करण्यासाठी आपण AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करू शकतात.

आपल्या मोबाइलमध्ये सन 2021-22 मध्ये AH-MAHABMS मोबाइल App डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गूगल प्ले स्टोअरवरुन पुन्हा नविन ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे जे नवीन असेल.

अर्जदारांनी अर्ज करते वेळी त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे बंधनकारक आहे.
तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील.

एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात बदल करता येणार नाही.

Ah Mahabms Scheme टोलफ्री नंबर

आपणास आम्ही या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती देण्याचा संपूर्ण प्रयत्न या लेखात केलेला आहे. तरी देखील तुम्हाला अद्याप काय शंका-कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून अधिक माहिती मिळावू शकता. योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.

कॉल सेंटर संपर्क – 1962 (10AM to 6PM).
टोल फ्री संपर्क -18002330418 (8AM to 8PM).

This Post Has 7 Comments

  1. Shivdas bhagat

    At post boda tel torora dist Gondia Maharashtra gram panchayat chaok boda

  2. Vishnu Gotiram Dawange

    ही योजना अत्यंत लाभदायक आहे

Leave a Reply